Vedang Raina: खुशी कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर वेदांग रैनाचे ‘या’ स्टारकिडसोबत जोडलं नाव
Vedang Raina: वेदांग रैना आणि खुशी कपूर यांनी दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर जानेवारीमध्ये त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर

Vedang Raina: ‘द आर्चीज’ फेम अभिनेता वेदांग रैना त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. खुशी कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर आता तो पुन्हा प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरू आहेत.
अलिकडेच तो सुपरस्टार राजेश खन्ना यांची नात नाओमिका सरनसोबत दिसला. कॅमेरा पाहताच नाओमिका तिचा चेहरा लपवताना दिसली, ज्यानंतर या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे.
वेदांग रैना आणि नाओमिका सरन नुकतेच ‘चांद मेरा दिल’ या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंग दरम्यान एकत्र दिसले. यावेळी दोघांमधील बाँडिंग स्पष्टपणे पाहायला मिळत होतं.
स्क्रिनिंग संपल्यानंतर जेव्हा पापाराझींनी त्यांचे एकत्र फोटो काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा नाओमिका अचानक लाजली आणि तिने कॅमेऱ्यासमोर आपला चेहरा लपवण्यास सुरुवात केली. यानंतर ती थेट वेदांगसोबत एकाच गाडीतून निघून गेली. यामुळेच त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. Vedang Raina
View this post on Instagram
हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट करत दोघे खूप ‘क्यूट’ असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी त्यांना ‘फ्युचर कपल’ असेही म्हटले आहे. मात्र, वेदांग आणि नाओमिका खरंच एकमेकांना डेट करत आहेत की नाही, याबाबत त्यांनी अद्याप अधिकृतपणे काहीसांगितलेले नाही.
दरम्यान, वेदांग रैना आणि खुशी कपूर यांनी दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली. यानंतर चाहत्यांकडून नाराजी देखील व्यक्त करण्यात आली. मात्र आता दोघेही आपल्या मार्गाने पुढे जात असल्याचे म्हंटले जात आहे.
हेही वाचा :
Gold Silver Rate: सोनं स्वस्त झालं आहे की महाग? ; आतापर्यंत चांदी १.८५ लाखांनी झाली स्वस्त





