Trisha Krishnan : “प्रेम कायम सगळ्यात प्रभावी असतं”; थलपती विजय यांच्या शपथविधीनंतर त्रिशाची पहिली पोस्ट
Trisha Krishnan : विजय यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर त्रिशाने पोस्ट शेअर करत लिहिलेल्या कॅप्शनने पुन्हा एकदा चर्चांनी जोर धरला

Trisha Krishnan : तामिळनाडूमध्ये व्हीसीके आणि आययूएमएलच्या पाठिंब्याने, थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने आता सरकार स्थापन केले आहे. विजय यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. टीव्हीकेच्या नऊ आमदारांनीही मंत्री म्हणून शपथ घेतली.
या सोहळयाला अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिने देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील त्रिशाच्या लुकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर आता तिने या कार्यक्रमादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या पोस्टला तिने दिलेल्या कॅप्शनने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेत्रीने नुकतच इन्स्टाग्रामवर ब्लू रंगाच्या सिल्क साडीतले काही फोटो शेअर केले आहे. सोन्याच्या जरीची नक्षी असलेल्या या साडीवर तिने ऑफ व्हाइट रंगाचा ब्लाऊज आणि साधे दागिने परिधान केले होते. या पोस्टला त्रिशाने ‘प्रेम कायम सगळ्यात प्रभावी असतं’ अशी कॅप्शन दिली आहे. अनेकांनी या पोस्टचा संबंध विजयशी लावला आहे. Trisha Krishnan
त्रिशा कृष्णन आणि विजय यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा अनेक वर्षांपासून सुरू आहेत. दोघांनीही अनेक सुपरहिट तमिळ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. मात्र, या चर्चांवर दोघांनीही कधीही भाष्य केलेलं नाही.
View this post on Instagram
अलीकडेच विजय यांच्या पत्नीने संगीता यांनी घटस्फोटाची याचिका दाखल करत विजय यांचे लोकप्रिय अभिनेत्रीसह विवाह बाह्य संबंध असल्याच्या दावा केला होता. तेव्हापासून या दोघांबद्दल चर्चात अधिक सुरू झाल्या. अशातच आता विजय यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर त्रिशाने पोस्ट शेअर करत लिहिलेल्या कॅप्शनने पुन्हा एकदा चर्चांनी जोर धरला आहे.
हेही वाचा:






