Drishyam 3 : प्रतिक्षा संपली! ‘दृश्यम 3’ची रिलीज डेट जाहीर; तारखेसोबत खास कनेक्शन
Drishyam 3 : 'दृश्यम'ची कहाणी विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबावर आधारित

Drishyam 3 : बॉलीवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अजय पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसणार आहे. या तिसऱ्या चित्रपटाचे अधिकृत शीर्षक ‘दृश्यम: द कन्क्लुजन’ असे असून या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
पहिल्या दोन भागांच्या दमदार यशानंतर तिसऱ्या भागाकडूनही प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहे. ‘दृश्यम’ साउथचा रिमेक असला तरी हिंदीतील हा तिसरा भाग साउथपेक्षा पूर्णपणे वेगळा असणार आहे. अजय देवगणने सिनेमाचं पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे. हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. Drishyam 3
पोस्टरमध्ये, अजयचा फक्त एक डोळा दिसत आहे. ज्यावर ‘मेरा सच, मेरा सही, सिर्फ मेरी फॅमिली है’ असं लिहिलेलं आहे. विशेष म्हणजे २ ऑक्टोबर आणि सिनेमाचं मोठं नातं आहेच. २ ऑक्टोबरवरुनच विजय साळगावकरने पणजीला सत्संगला गेल्याची कथा रचली होती जी आजही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असते. ‘हर इंसान का नजरिया अलग होता है…मेरे लिए मेरी फॅमिली ही सबकुछ है’ असं कॅप्शन त्यांनी लिहिलं आहे.
View this post on Instagram
‘दृश्यम’ची कहाणी ही विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबावर आधारित आहे. पहिल्या भागापासून कहाणीत अनेक सस्पेन्स पाहायला मिळाले. आता तिसऱ्या भागात काय वेगळं पाहायला मिळणार, याची अनेकांना उत्सुकता लागली आहे. या सिनेमात अजय देवगणसह श्रिया सरन, इशिता दत्ता, मृणाल जाधव, जयदीप अहलावत, तबू, रजत कपूर, कमलेश सावंत यांच्या मुख्य भूमिका आहेत.
दरम्यान, हिंदी ‘दृश्यम’ फ्रँचायझीची सुरुवात २०१५ मध्ये मोहनलाल यांच्या मल्याळम थ्रिलर चित्रपटाच्या रिमेकने झाली होती. या चित्रपटाने लवकरच प्रेक्षकांची मने जिंकली आणि जगभरात सुमारे ११० कोटी रुपयांची कमाई केली. २०२२ मध्ये आलेल्या ‘दृश्यम २’ ने फ्रँचायझीला आणखी एक पाऊल पुढे नेले आणि तो एक मोठा ब्लॉकबस्टर ठरला, ज्याने जगभरात सुमारे ३४२ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. Drishyam 3
हेही वाचा:
Neem Benefits: कडुलिंबाची ४ पाने खरंच १० आजार बरे करतात? जाणून घ्या व्हायरल दाव्यामागचं सत्य





