Shalini Pandey : अभिनेत्री शालिनी पांडेने तिच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत विविध जॅानरच्या चित्रपटांमध्ये आणि वेबसिरीजमध्ये काम केले आहे. आता तिला एका ॲक्शन चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. ‘धुरंधर’ हा तिचा सध्याचा आवडता चित्रपट असल्याचे सांगत शालिनीने दोन अभिनेत्यांना आपले आवडते अभिनेते म्हटले आहे. तसेच त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने यावर भाष्य केले आहे. अॅक्शन चित्रपटात काम करण्याची इच्छा केली व्यक्त “मी खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि मला खूप काही करायचं आहे असं वाटतं. मी आयुष्यभर खेळ खेळले आहे आणि मला खेळ खूप आवडतात, त्यामुळे मला अॅक्शन चित्रपटात काम करायला आवडेल असं वाटतं. मला अॅक्शन आवडते. मला त्यातला थरार आवडतो. त्यामुळे मला अॅक्शनच करायची आहे.” अशी इच्छा तिने मुलाखतीत बोलताना व्यक्त केली. अभिनेत्री कॉमेडी जॉनरबद्दल बोलताना म्हणाली, “कॉमेडी हे एक असे क्षेत्र आहे जे मला सखोलपणे आजमावून बघायचे आहे, कारण एक प्रेक्षक म्हणून मला त्यात आनंद मिळतो. मला ॲक्शन आणि कॉमेडी दोन्ही प्रकारच्या भूमिका करायला आवडतात.” “मला अशा लोकांसोबत काम करायचे आहे जे एक अभिनेता म्हणून मला प्रेरणा देतील, जे मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला प्रवृत्त करतील. मी जिथे आहे तिथे आरामदायक स्थितीत राहण्याचा प्रयत्न करत नाही असं नाही, पण मला एक अभिनेत्री म्हणून स्वतःला अधिक पुढे घेऊन जायचे आहे. मला अशा ठिकाणी राहायचे नाही जिथे माझी अजिबात वाढ होत नाहीये.” असे म्हणत तिने कम्फर्ट झोन सोडून इतर प्रकारच्या भूमिकांमध्ये काम करण्यात रस असल्याचे अधोरेखित केले. मुलाखतीमध्ये तिला तुला कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शालिनी म्हणाली, “मला आशा आहे की मला अशा व्यक्तीसोबत काम करण्याची संधी मिळेल जो मला पूरक असेल आणि मी त्या व्यक्तीला पूरक ठरू शकेन.” पुढे ती म्हणाली, “मला रणवीर सिंग खूप आवडतो. मी ‘धुरंधर’ पाहिला आहे, जो माझ्या अलीकडच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे, त्यामुळे मला वाटते की तो कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत चांगला दिसू शकतो. हृतिक रोशनसुद्धा या यादीत आहे, कारण मी त्याला लहानपणापासून या सर्व गोष्टी करताना पाहिले आहे. मला वाटते की हे दोघे पहिल्या क्रमांकावर आहेत.” असे म्हणत तिने या अभिनेत्यांसोबत काम करण्याचे इच्छा बोलून दाखवली. अर्जुन रेड्डी चित्रपटातून एन्ट्री अभिनेत्री शालिनी पांडे हिच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास तिने साऊथ चित्रपटसृष्टीत ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. त्यानंतर तिने 2022 मध्ये बॅालिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटातून डेब्यू केला. मात्र, चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर असफल ठरला. तसेच ‘राहु केतु’ या चित्रपटात तर ‘बैंडवाले’ या वेबसिरीजमध्ये शालिनी झळकली होती. हेही वाचा : US Iran War: “युद्धात आम्ही विजय मिळवला” ; इराणने सहमती दर्शवल्याचा ट्रम्प यांचा मोठा दावा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर महत्वाचे भाष्य