Kishwar Merchant : अभिनेत्री किश्वर मर्चंटने अनेक मालिकांमध्ये काम केले. याशिवाय ती ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोमध्येही देखील पाहायला मिळाली. मात्र ती वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. किश्वरला आंतरधर्मीय लग्नामुळे टीकेला सामोरं जावं लागलं होतं. यावरून होणाऱ्या ट्रोलिंगला तिने एका मुलाखतीत उत्तर दिले आहे. एका मुलाखतीत किश्वर मर्चंट म्हणाली की, ‘सुरुवातीला मला वाटलं होतं की, हे थोडं कठीण जाईल. आमचं ब्रेकअप सुद्धा झालं होतं, पण अवघ्या तीन दिवसांनी आम्ही पुन्हा एकत्र आलो. आम्ही हे नातं टिकवायचं ठरवलं आणि आज आम्ही हे नातं खूप सुंदरपणे निभावत आहोत.’ Preity Zinta Post : पंजाबच्या गोटात धुसफूस? श्रेयस अय्यरवर खेळाडू नाराज असल्याच्या चर्चा; मालकीण प्रिती झिंटाने सडेतोड उत्तर देत सत्य केलं उघड! मुलाबद्दल बोलताना किश्वर म्हणाली की, ‘माझे वडील दिवसातून पाच वेळा नमाज पठण करतात, पण त्यांनी सुयशला खूप चांगल्या प्रकारे स्वीकारलं. माझा मुलगा हनुमानजी, शंकर आणि सर्व देवांचा मोठा भक्त आहे. तो माझ्या वडिलांनाही सांगतो, ‘तुम्हाला माहित आहे का… नानू, हनुमानजी असे आणि तसे करतात? माझे वडील कधी मंदिरात गेले नसले तर त्याचं सगळं ऐकतात.’ Kishwar Merchant तिच्या मुलाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं, यावर ती म्हणाली, ‘माझ्या मुलानं ती टोपी घातली होती आणि बरेच लोक म्हणत होते, ‘तुम्ही त्याला अस्सलाम वालेकुम म्हणायला शिकवायला हवं.’ पण मला वाटतं, ‘तो आधी माणूस आहे, त्यामुळे माणुसकी आधी येते.’ दरम्यान, किश्वर मर्चंट आणि सुयश राय यांच्यामध्ये ८ वर्षांचं अंतर आहे. शिवाय या दोघांचे धर्म वेगवेगळे असल्याने सुरुवातीला त्यांचे कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. बऱ्याच अडचणींचा सामना केल्यानंतर या कपलने २०२६ मध्ये लग्नगाठ बांधली. २०२१ मध्ये या जोडप्याने त्यांच्या मुलाचे स्वागत केले, ज्याचे नाव त्यांनी ‘निर्वैर’ ठेवले आहे. किश्वर मर्चंटचा जन्म इस्मायली मुसलमान कुटुंबात झाला. तिने अनेक मालिका आणि रियालिटी शो मध्ये काम केलं आहे. 1997 साली किश्वरने शक्तिमान या मालिकेतून अभिनयात पदार्पण केलं. यानंतर ती ‘देश मे निकला होगा चांद’,’हातीम’,’कसोटी जिंदगी की’, ‘खिचडी’ ‘मिले जब हम तूम’, ‘प्यार की ये एक कहानी’ या मालिकांमध्ये दिसली. Kishwar Merchant हेही वाचा: Baramati Plan Crash : बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं! नेमकी घटना कशी घडली?