Kiara Advani: बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरलं तिच्या लेकीचं एक अतिशय गोंडस छायाचित्र. कियाराने नुकतीच तिची मुलगी सरायाह मल्होत्राची एक खास झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विमानप्रवासादरम्यानचा हा क्यूट क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर प्रेमाचा वर्षाव केला जात आहे. कियाराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ही खास पोस्ट शेअर केली. या छायाचित्रात विमानाच्या खिडकीजवळ एक रंगीत खेळणं लावलेलं दिसत आहे. खिडकीबाहेर सुंदर आकाश आणि ढगांचं मनमोहक दृश्य पाहायला मिळतं. मात्र या फोटोचं खरं आकर्षण ठरलं ते म्हणजे छोट्या सरायाहचा नाजूक हात. फोटोमध्ये सरायाह त्या खेळण्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसते. हा गोंडस क्षण पाहून चाहते अक्षरशः भारावून गेले आहेत. (Kiara Advani) कियाराने या फोटोसोबत फक्त लाल रंगाचं हार्ट इमोजी पोस्ट केलं आहे. कोणतंही कॅप्शन न देता तिने हा खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केला. सोशल मीडियावर चाहत्यांनी या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी “खूपच गोड”, “क्यूटेस्ट मोमेंट” अशा कमेंट्स केल्या आहेत. Kiara Advani Kiara Advani: विमानातील क्यूट क्षण व्हायरल! कियारा आडवाणीने दाखवली लेक ‘सरायाह’ची खास झलक सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक मानले जातात. दोघेही त्यांच्या खासगी आयुष्याबाबत खूपच प्रायव्हेट राहणं पसंत करतात. गेल्या वर्षी जुलै २०२५ मध्ये त्यांनी लेक सरायाहचं स्वागत केलं होतं. मात्र आजपर्यंत त्यांनी मुलीचा चेहरा सोशल मीडियावर दाखवलेला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये सरायाहबद्दल नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते. (Kiara Advani) सध्या कियारा आणि सिद्धार्थ कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. त्याचदरम्यान कियाराने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक चाहत्यांनी “स्टार किडची सर्वात क्यूट झलक” असं म्हणत फोटो शेअर केला आहे. दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झालं तर कियारा आडवाणी लवकरच टॉक्सिक या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत यश आणि नयनतारा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. याशिवाय हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्याही भूमिका चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या आगामी व्हीव्हॅन चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तमन्ना भाटिया झळकणार आहे.