Eetha Movie Song : नऊवारीचा थाट, नथीचा साज अन् पायात घुंगरू! ‘ईठा’मधील श्रद्धा कपूरचं पहिलं गाणं पाहून चाहते भारावले
Eetha Movie Song : या चित्रपटातील ‘जी जी रं जी’ हे पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झाले असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.या गाण्यात श्रद्धा कपूरचा लावणीप्रधान अंदाज पाहायला मिळत आहे.

Eetha Movie Song : महाराष्ट्राच्या लोककलेचा सुवर्णकाळ घडवणाऱ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित ‘ईठा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूर विठाबाई यांची मध्यवर्ती भूमिका साकारत असून, तिचा पारंपरिक लूक आणि दमदार अभिनय पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. (Eetha Movie Song)
या चित्रपटातील ‘जी जी रं जी’ हे पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झाले असून, त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.या गाण्यात श्रद्धा कपूरचा लावणीप्रधान अंदाज पाहायला मिळत आहे. नऊवारी साडी, नाकात नथ, हातात बाजूबंद, केसांत गजरा आणि पायात घुंगरू अशा पारंपरिक वेशभूषेत श्रद्धा खूपच सुंदर दिसत आहे. (Eetha Movie Song)
गाण्यातील तिचे हावभाव, अदाकारी आणि नृत्यकौशल्य यांचे नेटकऱ्यांकडून विशेष कौतुक होत आहे. ‘जी जी रं जी’ या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले असून, लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल हिने आपल्या सुरेल आवाजात हे गाणं गायले आहे. तर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका वैभवी मर्चंट हिने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केलं आहे. गाण्यातील पारंपरिक ठेका, संगीत आणि श्रद्धाचा नृत्याविष्कार यामुळे या गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Eetha Movie Song)
विशेष म्हणजे, या गाण्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव याचीही झलक पाहायला मिळत आहे. ढोलकी वादन करताना त्याचा अंदाज लक्षवेधी ठरत आहे. दरम्यान, ‘ईठा’ हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा कपूरसोबत रणदीप हुड्डा, अनंत जोशी आणि सिद्धार्थ जाधव यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. (Eetha Movie Song)





