Alia and Ranbir 4th Wedding Anniversary: आलिया भट्ट व रणबीर कपूर यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाले आहे. या जोडीने १४ एप्रिल २०२२मध्ये लग्न केलं. लग्नानंतर त्यांची मुलगी राहाचा जन्म झाला. नुकतेच लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दोघे लेक राहासोबत ऑस्ट्रियामध्ये गेले आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आलियाने ऑस्ट्रियामधील त्यांचे खास फोटो शेअर केले आहेत. दोघांनी एकत्रित हा खास दिवस साजरा केल्याचं तिने शेअर केलेल्या फोटोंमधून पाहायला मिळत आहे. आलियाने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये रणबीर, राहा आणि तेथील अल्पाका प्राणी दिसत आहेत. आलियाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती तिचा पती रणबीर कपूरसोबत आनंदाने पोज देताना दिसत आहे. यावेळी आलिया काळ्या रंगाच्या स्वेटरमध्ये खूपच गोड दिसत आहे, तर रणबीर कपूरही राखाडी रंगाचा स्वेटर आणि टोपी घालून देखणा दिसत आहे. Alia and Ranbir 4th Wedding Anniversary Aliya and Ranbir लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान रणबीर-आलियाने बर्फाळ दऱ्यांमध्ये स्कीइंगचाही मनसोक्त आनंद लुटला. स्कीइंगनंतर या जोडप्याने कँडल लाइट डिनरचाही आनंद घेतला. Alia and Ranbir 4th Wedding Anniversary हे फोटो शेअर करताना आलियाने रणबीरसाठी एक रोमँटिक पोस्ट लिहिली आहे, त्यात ती म्हणते, “आपण मिळून एक अतिशय सुंदर आयुष्य घडवलं आहे. थोडक्यात सांगायचं तर… तू सोबत आहेस, तर दिवस आणि रात्र आहे.” सध्या हे दोघे संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. यात विकी कौशलसुद्धा पाहायला मिळणार आहे. Alia and Ranbir 4th Wedding Anniversary हेही वाचा : Aaditya Thackeray : मोठी राजकीय घडामोड! आदित्य ठाकरे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सांभाळणार?