गेममधून मित्र- मैत्रिणींची पोलखोल करणाऱ्या ‘खेल खेल में’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : अक्षय कुमारचा कॉमेडी चित्रपट ‘खेल खेल में’ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि त्याच्या मित्रांमध्ये लागलेली स्पर्धा आणि त्यातून होणारी पोलखोल कॉमेडी पद्धतीनं दाखवण्यात आली आहे. याच झलक तुम्हाला ट्रेलरमध्ये पाहायला मिळू शकते. या चित्रपटात अक्षय कुमार, एमी वर्क, तापसी पन्नू आणि वाणी कपूर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
या चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास 2016 मध्ये रिलीज झालेल्या ‘परफेक्ट स्ट्रेंजर्स’चा ‘खेल खेल में’ हा चित्रपट हिंदी व्हर्जन आहे. ट्रेलरमध्ये मित्र आपापसात भेटतात आणि पार्टी करण्याचे ठरवतात. जेव्हा पार्टीमध्ये सगळे मित्र-मैत्रिण एकत्र येतात तेव्हा ते एक गेम खेळण्याचं ठरवतात. मोबाईल फोन अनलॉक करून टेबलवर ठेवण्याची ही स्पर्धा असते. ज्याला पहिल्यांदा फोन किंवा मॅसेज येईल तो सर्वांना वाचून दाखवेल. अशी अट या स्पर्धेत असते. याचाच आधार घेत हा चित्रपट बनवण्यात आला आहे. यातून सगळ्यांची होणारी पोलखोल आणि अनेक गुपित मनोरंजक पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहेत.
‘खेल खेल में’ चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीज यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, एमी वर्क, तापसी पन्नू आणि वाणी कपूर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दाखवली असून आता प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित होण्याची उत्सुकता लागलेली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. तसेच या चित्रपटासोबत हॉरर कॉमेडी फिल्म ‘स्त्री 2’ देखील प्रदर्शित होणार आहे.




