Bollywood Celebrity Drug Party: बॉलिवूड विश्व पुन्हा एकदा ड्रग्ज प्रकरणामुळे खळबळून उठलं आहे. मुंबईत झालेल्या एका alleged ड्रग्ज पार्टी बाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, या पार्टीत अनेक नामांकित कलाकारांची उपस्थिती असल्याचा दावा करण्यात आला आहे. यात नोरा फतेही, श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धार्थ कपूर, तसेच ओरहान अवत्रामणी (ओरी) यांची नावं आल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. प्रकरण काय? ड्रग्ज रॅकेटचा मोठा पर्दाफाश करताना मुंबई पोलिसांनी दुबईतून आरोपी मोहम्मद सलीम शेख याला भारतात आणलं. तपासादरम्यान सलीम शेख हा बॉलिवूडमधील काही कलाकारांना अंमली पदार्थ पुरवत असल्याचा खुलासा पोलिसांनी न्यायालयात केला. यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीत अनेक सेलिब्रिटींची नावं पुढे आली आहेत. या यादीत फिल्ममेकर जोडी अब्बास-मस्तान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अतिशाह पारकर यांचाही समावेश असल्याचा दावा आहे. ड्रग्ज पार्टी कुठे होत होती? तपासात समोर आलेल्या माहितीनुसार काही ड्रग्ज पार्ट्या मुंबईत,तर काही दुबई आणि गोवा येथे झाल्या होत्या. या पार्टींना सलीम शेख स्वतःही उपस्थित होता. त्यामुळे त्याने दिलेल्या माहितीनुसार आता बॉलिवूड कलाकारांची चौकशी होण्याची शक्यता वाढली आहे. पुढचा तपास कोणत्या दिशेने? पोलिस आता पुढील मुद्द्यांचा तपास करत आहेत. या रॅकेटमागे आणखी कोणते तस्कर आहेत? पार्टींसाठी पैसा कुठून आणि कसा येत होता? अजून कोणकोणते सेलिब्रिटी या ड्रग्ज पार्टींमध्ये सहभागी होते? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.