‘रक्षाबंधनसाठी’अक्षय कुमारची जोरदार खरेदी, साडीच्या दुकानातील फोटो झाले viral

मुंबई – अक्षय कुमार आपल्या रक्षाबंधन चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जोरदार फंडे वापरात आहे. सर्वसामान्यांमध्ये जाऊन अक्षय कुमार आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करतोय.अक्षय कुमार सध्या अहमदाबादच्या दौऱ्यावर आहे. यावेळेसचे अक्षयचे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडींगला आहेत. कारणही तसाच आहे.
यावेळी ‘रक्षा बंधन’ची टीम अहमदाबादमध्ये असताना अक्षयने बहिणींना साडीच्या दुकानात नेले आणि त्यांना अहमदाबादच्या पारंपरिक साड्या भेट देऊन आश्चर्यचकित केले. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अक्षय कुमार आणि आनंद एल राय यांनी पत्रकार परिषदेत देखील सहभाग घेतला आणि माध्यमांशी संवादही साधला. आनंद एल राय यांचा चित्रपट रिलीज होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे.

‘रक्षा बंधन’मध्ये भूमी पेडणेकर आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय नीरज सूद, सीमा पाहवा, सादिया खतीब, अभिलाष थापलियाल, दीपिका खन्ना, स्मृती श्रीकांत आणि सहमीन कौर यांच्याही विशेष भूमिका आहेत.हिमेश रेशमियाने ‘रक्षा बंधन’चे संगीत दिले आहे. अक्षय कुमारचा रक्षाबंधन आणि आमिर खानचा लाल सिंग चड्डा हे दोन्हीही चित्रपट ११ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहेत.

अक्षय कुमारच्या या फोटोजचा मिम्स बनवणाऱ्यानी चांगलाच वापर केलाय. मिम्समध्ये कोणी अक्षय कुमारला दुकानाचा मालक केलाय तर कोणी त्याला साडी दुकानातला कामगार म्हणून हिणवलंय. अक्षयच्या या फोटोजवर चाहत्यांनी भरमसाठ कमेंटचा वर्षाव केला आहे.




