आलिया भट्टने शेअर केला जबरदस्त वर्कआउट व्हीडिओ, व्यायाम पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क

Alia Bhatt Workout Video | कलाकारांकडून त्यांच्या फिटनेसला विशेष महत्त्व दिले जाते. आहार, व्यायामाला कलाकार नेहमीच प्राधान्य देतात. प्रसिद्ध अभिनेता-अभिनेत्रींचा ‘फिटनेस मंत्र’ जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. कलाकारांकडूनही व्यायामाचे व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. सध्या प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टचा असाच एक व्यायाम करतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
आलिया भट्टला तिच्या फिटनेससाठी ओळखले जाते. ती अनेकदा सोशल मीडियावर व्यायाम करतानाचे व्हीडिओ पोस्ट करत असते. आता तिने असाच एक व्हीडिओ शेअर केला आहे. ‘संघर्ष महत्त्वाचा आहे’, असे कॅप्शन देत आलियाने हा व्हीडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
या व्हीडिओमध्ये आलिया क्लॅप पुशअप्स करताना दिसत आहे. यामध्ये अवघड व्यायाम देखील आलिया अगदी सहजरित्या करताना दिसत आहे. तिचा हा वर्कआउट करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिला असाप्रकारे व्यायाम करताना पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत.
दरम्यान, आलियाच्या कामाबद्दल सांगायचे तर ती लवकरच ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्यासोबत या चित्रपटात झळकणार आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा ‘जिगरा’ हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.





