मुंबई – देशभर कोरोनाचे संकट गडद होत असताना आणि अख्खा देश लॉकडाऊन असताना पोलिस, आरोग्य कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी मात्र रस्त्यावर आहेत. कोरोनासारख्या अदृश्य शत्रूशी लढत आहेत. या कोरोना वॉरियर्सच्या सन्मानार्थ चित्रपसृष्टीतील अनेक कलाकारांनी आपला सोशल अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवला आहे.
असे आवाहन महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी असे आवाहन देशातील प्रत्येक नागरिकाला केले आहे. दरम्यान, त्यांच्या या आवाहन प्रतिसाद देत अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, वरून धवन, कार्तिक आर्यन, अर्जुन कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, वाणी कपूर अश्या अनेक कलाकारांनी आपला डीपी बदलत त्याठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचा लोगो लावला आहे.
“सदैव देशसेवेस कर्तव्यतत्पर असणारे पोलीस एकटे नाहीत हे अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मी फेसबुक, ट्विटर व इन्स्टाच्या अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवणार आहे. तुम्हीही आपला डीपी ठेवून पोलीस बांधवांच्या सन्मानात सहभागी व्हा…” असे ट्विट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले होते.