मुंबई – बॉलीवूड अभिनेखी प्रणती राय प्रकाश ही हेल्थबाबत खूपच सजग असते. ती उत्तम आरोग्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये योगाला खूप महत्त्व देते. तिने आपल्या चाहत्यांना योगाचे महत्त्व समजावे आणि ते आचरणात आणावे यासाठी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
प्रणति राय प्रकाश ही सतत आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडिओ शेअर करत असते. या व्हिडिओमुळे चाहतेदेखील प्रभावित होत असतात. प्रणति राय ही आपल्या आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि फिटनेसमुळे कायम चर्चेत असते. प्रणतीने शेअर केलेल्या या व्हिडिओत ती योग करताना दिसत आहे. यात तिने विविध योगासन केले आहेत.
View this post on Instagram
हा व्हिडिओ शेअर करत तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केली की, योग आणि ध्यान हे मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी एक उत्तम अभ्यास आहे. योगासन हे आपल्याला आत्मा जागरूक ठेवण्याची योग्य पद्धत शिकवितात. याशिवाय ते मला स्वस्थ आणि आनंदी राखण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास प्रणती राय प्रकाश ही मनफोडगंज की बिन्नीफ आणि लव आज कल-2फ यासारख्या बिग बजेट चित्रपटात झळकली आहे. तसचे ती आगामी अनेक चित्रपटात काम करत आहे.