दारवली हद्दीत आढळला तरुणाचा मृतदेह; पौड पोलिसांकडून तपास सुरू
Updated On:

पुणे: पौड ता. मुळशी येथे असलेल्या परमार बंगल्याशेजारी दारवली गावच्या हद्दीत सागर भाऊरव मेश्राम ( वय ३२ वर्षे पत्ता रा. गंगापुरी वाई सातारा जि.सातारा ) या तरूणाचा मृतदेह मिळून आला आहे.
बांधकाम व्यावसायिक विलास परमार ( रा.कँम्प, पुणे) यांच्या मालकीचा बंगला पौड येथे आहे. मात्र, याठिकाणी गेले काही वर्ष हिंदूराष्ट्र सेनेचे धनजंय देसाई यांचे वास्तव्य आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे असलेल्या गोशाळेत मयत सागर हा गुराख्याचे काम करायचा. त्याचा मृतदेह (दि.२४) रोजी सकाळी मिळून आला असून घटनास्थळी पौड पोलिसांनी धाव घेतली असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शखाली पोलिस अधिक तपास करत आहेत.





