Bobby Deol Upcoming Movie : अॅनिमल या चित्रपटातील एका वेगळ्या भूमिकेनंतर अभिनेता बॅाबी देओलच्या करिअरला बुस्ट मिळाला. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर बॅाबीला अनेक चित्रपटांच्या अॅाफर्स मिळाल्या. आता पुन्हा एकदा बॅाबी चर्चेत आला आहे, त्याच्या आगामी चित्रपटामुळे. या चित्रपटाचे नाव बंदर असून गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. अखेर या चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीज करण्यात आले असून, बॅाबी देओलचा लूक रिव्हील करण्यात आला आहे. तसेच चित्रपटाच्या रिलीज डेटचीही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बॅाबीच्या चाहत्यांना या चित्रपटाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. View this post on Instagram A post shared by Saffron Magicworks (@saffronmagicworks) बंदरच्या नवीन पोस्टरमध्ये बॅाबी कूल अंदाजात दिसत आहे. हातात गिटार समोर माईक आणि वेगळ्या वेशभूषेत असल्यामुळे ९० च्या दशकातील चित्रपटांची आठवण येते. ‘बंदर’चा टीझर ७ मे रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या टीझरसाठी बॅाबीच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या चित्रपटात बॉबी देओलसह सान्या मल्होत्रा, सपना पब्बी, सबा आझाद, इंद्रजित सुकुमारन, जितेंद्र जोशी, राज बी. शेट्टी आणि नागेश भोसले या कलाकारांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे लेखन सुदीप शर्मा आणि अभिषेक बॅनर्जी यांनी केले असून, दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती निखिल द्विवेदी यांच्या ‘सॅफ्रन मॅजिक वर्क्स’ या निर्मिती संस्थेअंतर्गत झाली आहे. हा चित्रपट ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हेही वाचा : Self Care: आठवड्यातला एक दिवस फक्त स्वतःसाठी! सेल्फ केअरचे हे मॉडर्न उपाय नक्की करून पाहा