Bobby Deol : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासने पुढच्या वर्षासाठी आधीच जोरदार तयारी केली आहे. तो दोन मोठ्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. एक म्हणजे ‘राजा साब’ आणि दुसरा म्हणजे ‘स्पिरीट’. राजा साब चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, त्यानंतर स्पिरीट येणार आहे. बहुचर्चित स्पिरीट चित्रपटात अभिनेता बॅाबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार होता. पण आता त्याचा पत्ता कट करण्यात आला असून, त्याच्या जागी एका नव्या कलाकाराची एन्ट्री चित्रपटात झाली आहे. प्रभासने नुकतेच स्पिरीट चित्रपटावर काम करण्यास सुरूवात केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा करत असल्याने आत्तापासूनच चित्रपटाची मोठी हवा आहे. प्रभाससोबत अनेक कलाकार चित्रपटात झळकणार आहेत. मोहनलाल, रणबीर कपूर या कलाकारांची चित्रपटात एक छोटी भूमिका साकारणार असल्याचे माहिती समोर आली होती. पण बॉबी देओलचा पत्ता चित्रपटातून कट करण्यात आला आहे. बॅाबीच्या जागी आता स्पिरीटमध्ये दक्षिण कोरियन अभिनेता डॉन ली सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत चित्रपटाच्या टीमकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण डॅान लीच्या नावाची चर्चा सुरू असून, तो चित्रपटात महत्वाची भूमिका साकारू शकतो. त्याची अधिकृत एन्ट्री स्पिरीटमध्ये झाल्यास एक अनोखे समीकरण पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरी, विवेक ओबेरॉय, प्रकाश राज आणि कांचना हे देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. स्पिरीट चित्रपटाची रिलीज डेट अद्यापर्यंत उघड करण्यात आलेली नाही. सध्या चित्रपटावर काम सुरू असल्याची माहिती असून, चित्रपटाच्या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या बिग बजेट चित्रपटासाठी प्रभासचे चाहते उत्सुक झाले आहेत. हेही वाचा : दिल्ली बॉम्बस्फोट : दहशतवादी उमर नबीला आश्रय देणाऱ्या शोएबला NIA कडून अटक