‘रामायण’ चित्रपटातून बॉबी देओल बाहेर? सत्य आलं समोर

Ramayana Film | बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची पहिली झलक समोर आली. यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटाच्या कलाकारांबाबत रोज नवीन खुलासे होत आहेत. यातच आता ‘रामायण’ चित्रपटात बॉबी देओल कुंभकर्णाची भूमिका साकारणार आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात होता. त्याबाबतचे सत्य समोर आले आहे.
बॉलिवूड हंगामाच्या एका वृत्तानुसार, बॉबी देओल ‘रामायण’ चित्रपटाचा भाग नसणार आहे. बॉबी देओल या चित्रपटात कोणतीही भूमिका साकारत नाही. ही बातमी ऐकून अभिनेत्याचे चाहते खूप निराश झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बॉबी चित्रपटात कुंभकर्णाची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त समोर येत होते.
याबाब तएका सूत्राने स्पष्ट केले आहे की, बॉबी देओलचे नाव या प्रोजेक्टसोबत अजिबात जोडलेले नाही. कलाकारांबद्दल लोक विविध अंदाज लावत आहेत. परंतु सत्य हे आहे की या पात्रासाठी अद्याप कोणतीही निश्चित एन्ट्री झालेली नाही.
या चित्रपटात दिसणार बॉबी देओल
बॉबी देओल सध्या ‘हरि हर वीरा मल्लू: पार्ट 1’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात त्याच्यासोबत साउथ स्टार पवन कल्याण, निधि अग्रवाल, नर्गिस फाखरी, नोरा फतेही आणि सत्यराज यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो आलिया भट्टसोबत ‘अल्फा’ हा चित्रपटातही दिसणार आहे.
‘रामायण’मध्ये दिसणार हे मोठे स्टार्स
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूर श्रीराम, यश रावण आणि साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय लक्ष्मणाची भूमिका रवि दुबे आणि हनुमानाची भूमिका बॉलिवूडचा दमदार अभिनेता सनी देओल साकारणार आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. तर दुसरा भाग २०२७ च्या दिवाळीला प्रदर्शित होईल. Ramayana Film |
हेही वाचा:
तामिळनाडूत रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या स्कूल बसला रेल्वेची धडक ; दोन मुलांचा दुर्दैवी अंत





