रेस-3, हाउसफुल-4 आणि आश्रम वेबसीरीजने अभिनेता बॉबी देओलच्या करियरला कलाटनी दिली आहे. मागील काही काळ बॉबीसाठी खूपच निराशाजनक ठरला होता. यानंतर त्याने मुख्य नायकाऐवजी कोणतीही भूमिका साकारण्यास प्राधान्य दिले आहे. “आश्रम’मध्ये साकारलेली खलनायकाची भूमिका चाहत्यांना खूपच आवडली आहे.
View this post on Instagram
2020मध्ये सर्वाधिक पाहण्यात आलेल्या सीरीजमध्ये “आश्रम’चे नाव असून यातील बॉबी देओलचा अभिनय चाहत्यांना खूपच आवडला होता. या सीरीजला चाहत्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. “कबीर सिंह’सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट साकारणारे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा हे आपला आगामी चित्रपट रणबीर कपूरसह साकारत आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी रणबीर खूपच उत्साहित आहे. दरम्यान, या चित्रपटात बॉबी देओलही झळणार आहे. यातील त्याच्या भूमिकेबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. परंतु यात तो खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तो रणबीर कपूरविरोधात उतरणार असून त्याच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.