मुंबई महापालिकेत भाजपाला ‘एवढ्या’ जागा मिळणार? ; भाजपच्या ‘या’ नेत्याचा मोठा दावा, पोस्ट शेअर करत सांगितला थेट आकडा

BMC Election Result। मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल पुढच्या काही वेळात हाती येणार आहे. मात्र त्या अगोदरच भाजपच्या एका नेत्याने मुंबई महापालिकेत भाजपला किती जागा मिळणार याचा थेट आकडाच सांगून टाकला आहे. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
मुंबईतील १५ हजारांहून अधिक उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे. ठाकरे ठाकरे बंधूंना किती जागा मिळणार? भाजपा शिवेसना शिंदे गटाला किती जागा मिळणार? याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलेलं असतानाच आता भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये १००+ जागा मिळेल असा मोठा दावा केला आहे. या संदर्भात मोहित कंबोज यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. BMC Election Result।
Bjp Mumbai Crossing 100+ @BJP4Mumbai @AmeetSatam
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitkamboj_) January 15, 2026
दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी काल मतदान पार पडले. त्यानंतर आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया विविध ठिकाणच्या 23 मतमोजणी कक्षात होणार आहे. दरम्यान, देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जातात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण 227 निवडणूक प्रभागांकरिता एकूण 23 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय अंतर्गत अभिरक्षा कक्ष व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. BMC Election Result।





