काय सांगता..! शेतात वीज पडली अन् जमिनीतून सुरु झाला निळ्या पाण्याचा प्रवाह; पाहा Video

यंदा नियमित तारखेपेक्षा दोन दिवस अगोदर मान्सूनने राज्यात एंट्री केली. तेव्हापासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने चांगलाच जोर धरलाय. अशात मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात पावसाळ्या दरम्यान अजब घटना घडली आहे.
धारशिवमधील शेतात निळे पाणी येत आहे. हे पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे…. pic.twitter.com/tggdh9D16e
— jitendra (@jitendrazavar) June 11, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, धारशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात मसला गावात एका शेतात वीज पडली. त्यानंतर त्या शेतीतील जमिनीतून निळ्या रंगाचे पाणी वाहू लागले. भूगर्भतून निळे पाणी येऊ लागल्यामुळे ते पाहण्यासाठी परिसरातील गावकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे. या ठिकाणचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये वीज पडल्यानंतर शेतातून निळे पाणी वाहू लागले आहे. या घटनेची स्थानिक प्रशासनाने दखल घेतली असून प्रशासनाकडून सुरु भूगर्भ शास्त्रांची मदत घेतली जाणार आहे. वीज पडलेल्या ठिकाणाहून अगदी गडद निळ्या रंगाचे हे पाणी वाहत आहे. धारशिव जिल्ह्यातील या प्रकारामुळे आश्चार्य व्यक्त केले जात आहे. मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस सुरु झाला आहे. परंतु धारशिवमधील प्रकारची चर्चा सर्वत्र सुरु आहे. दरम्यान आता सोशल मीडियावर या ठिकाणचा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओवर युजर्सही अंदाज लावतांना दिसत आहे.





