आता होणार रक्त चाचणीतून कर्करोगाचे निदान; ‘या’ देशात घेतली एक लाख 40 हजार लोकांची चाचणी

लंडन – कर्करोगसारख्या घातक रोगाचे लवकर निदान होणे आवश्यक असते. या पार्श्‍वभूमीवर केवळ रक्ताची चाचणी करून कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी संशोधन सुरू असून,  ब्रिटनमध्ये याबाबत एक लाख 40 हजार लोकांवर चाचणी घेण्यात आली आहे.

कॅलिफोर्नियातील ग्रील कंपनीने ही चाचणी विकसित केली. असून या चाचणीमुळे 50 पेक्षा जास्त प्रकारचे कर्करोगाचे निदान लवकर होऊ शकते असा कंपनीने दावा केला आहे. कंपनीच्या या किटचा वापर अमेरिकेत सध्या केला जात आहे.

जगात दरवर्षी एक कोटी पेक्षा जास्त लोक कर्करोगाने निधन पावतात कर्करोगाचे निदान उशिरा झाल्यामुळेच मृत्यूचे प्रमाण जास्त असते त्यामुळेच हे निदान जर पहिल्या टप्प्यात झाले. तर योग्य उपचार करून रुग्णाला बरे करणे शक्य असल्याने ही नव्या प्रकारची चाचणी सुरु करण्यात आली आहे.

कर्करोगाचे निदान करण्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जातात पण या कंपनीने विकसित केलेली ही चाचणी फक्त रक्ताची चाचणी असून त्याआधारे पन्नासपेक्षा जास्त प्रकारच्या कर्करोगाचे निदान पहिल्या टप्प्यात होऊ शकते. माणसाच्या जेनेटिक कोड मध्ये कर्करोगामुळे जे बदल होतात.

त्या तत्त्वाच्या आधारे ही रक्ताची चाचणी कर्करोगाचे निदान करू शकते महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविध प्रकारच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी सध्या वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात. पण या एकाच चाचणी ने आता सर्व प्रकारच्या कर्करोगाचे निदान वेळेच्या आधीच करणे शक्‍य होणार आहे त्यामुळे आरोग्य क्षेत्रात मी एक महत्वाची क्रांती मानली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.