Blood Pressure : ‘हायपरटेन्शन’, ज्याला उच्च रक्तदाब म्हणून ओळखले जाते, याचा अर्थ पुरवठा धमन्यांमधील दाब असावा त्यापेक्षा जास्त आहे. उच्च रक्तदाब म्हणजे 140/90 किंवा त्याहून अधिक दाब. जास्त काळ असा दाब राहिला तर त्याचा दुष्परिणाम हळूहळू दिसायला लागतो. वाढलेले ब्लडप्रेशर लगेच कळून येत नाही म्हणूनच ते धोकादायक आहे.
परंतु जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे नियमित तपासणी करत असाल आणि औषधाचा योग्य वापर करत असाल तर तुम्ही त्याचे होणारे दुष्परिणाम टाळू शकता. याचे शिकार फक्त वयस्कर लोकचं नाही तर तरूणसुद्धा होत आहेत. हाय ब्लड प्रेशरची कोणतीही खास लक्षणं नसतात.
पण या आजाराला सायलेंट किलरच्या स्वरूपात ओळखलं जातं. तुम्ही देखील या आजारा पासून दूर राहू शकता, फक्त तुमच्या लाईफस्टाईल आणि डाएटमध्ये बदल करणं आवश्यक आहे. हाय ब्लड प्रेशर टाळण्यासाठी आहार थोडा बदल करणे आवश्यक असते, ते पुढील प्रमाणे….
– मूग डाळीचं सूप…
हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी मूंग डाळीचं सूप उत्तम आहे. हे सूप बनवण्यासाठी सीताफळ, जीरं आणि एक चिमुटभर हळद मिसळा, मूग डाळ ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करते.
– मध पाणी…
एका कपात गरम पाणी घेऊन त्यात 1 चमचा मध आणि 5 ते 10 थेंब एपल सायडर व्हिनेगर घाला आणि सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा. यामुळे कोलेस्टेरॉल कमी होऊन हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
– संत्रा रस आणि नारळ पाणी…
जर ब्लड प्रेशर नेहमीच हाय होत असेल तर एका ग्लास संत्र्याचा रस आणि नारळाचं पाणी मिसळून प्या. दिवसातून कमीत कमी 2 ते 3 वेळा अर्धा अर्धा कप पाणी प्या.
– काकडी…
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते. काकडीचा रायता निरोगी आरोग्यासह रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात फायदेशीर ठरते.
– कलिंगड…
कलिंगडावर एक चिमुटभर वेलची आणि एक चिमुट धणे पावडर घालून खाल्यानं तुम्हाला आराम मिळू शकतो. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
– पीच फळ…
एक कप ताज्या पीचच्या रसात एक चमचा धणे आणि चिमूटभर वेलची पावडर घातल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. दिवसभरात 2 ते 3 वेळा या फळांचा रस प्या.
डॉक्टरांना कधी भेटायचे?
– जरी उच्च रक्तदाबामुळे क्वचितच लक्षणे दिसून येतात, परंतु ज्यांना अचानक, तीव्र डोकेदुखी किंवा नाकातून रक्तस्त्राव होत असेल त्यांनी त्यांचा रक्तदाब तपासावा.
– जर एखाद्या व्यक्तीला छातीत दुखणे, श्वास लागणे किंवा चक्कर येणे यासारखी गंभीर लक्षणे जाणवत असतील, तर त्यांनी आपत्कालीन वैद्यकीय उपचारांसाठी बोलावले पाहिजे कारण त्यांना
ब्लड प्रेशर तपासायचे कसे?
स्टेथोस्कोप, कफ, डायल, पंप आणि व्हॉल्व्ह असलेले स्फिग्मोमॅनोमीटर म्हणून ओळखले जाणारे उपकरण वापरून, रक्तदाब वारंवार मोजला जातो. रक्तदाब दोन संख्यांमध्ये नोंदविला जातो:
सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दाब. जेव्हा हृदय संपूर्ण शरीरात रक्त पाठवते तेव्हा हृदयाचा ठोका असताना सिस्टोलिक रक्तदाब हा जास्तीत जास्त दाब असतो. डायस्टोलिक रक्तदाब – जेव्हा हृदय रक्ताने भरलेले असते, तेव्हा हृदयाच्या ठोक्यांमधील सर्वात कमी दाब असतो.
सामान्य रक्तदाब, कमी रक्तदाब आणि उच्च रक्तदाब असे वेगवेगळे रक्तदाब आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकाची भिन्न मूल्ये आहेत, त्यानुसार त्यांना उपचार आणि नाव दिले जाते.