– प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे Blood Donation : तुमच्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो, ही भावनाच मनाला आनंदीत करून जाते. रक्तदानाबाबत (Blood Donation) असलेले काही गैरसमज दूर करून रक्तदात्यांची संख्या वाढली पाहिजे. लंडनमधील फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्युटच्या नवीन संशोधनानुसार, वारंवार रक्तदान करणार्यांना सूक्ष्म अनुवांशिक बदलांचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे त्यांना रक्ताचा कर्करोग होण्याचा धोका कमी होऊ शकतो. यासह, वाढत्या प्रमाणातील पुराव्यांवरून नियमित रक्तदानामुळे (Blood Donation) अनेक आरोग्यविषयक फायदे मिळू शकतात. जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या रक्त तयार करणार्या स्टेम पेशी नैसर्गिकरित्या उत्परिवर्तन (Mutation) करतात, ही प्रक्रिया Clonal Heamatopoiesis म्हणून ओळखली जाते. यापैकी काही उत्परिवर्तनांमुळे रक्ताच्या कर्करोगासारख्या रोगांचा धोका वाढतो. फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्युटच्या नवीन अभ्यासानुसार, 60 वर्षे वयाच्या निरोगी पुरुष रक्तदात्यांच्या दोन गटांची तुलना केली गेली. एका गटाने 40 वर्षे वर्षातून तीन वेळा रक्तदान केले होते, तर दुसर्या गटाने 40 वर्षांत एकूण पाच वेळाच रक्तदान केले होते. Blood Donate दोन्ही गटांमध्ये अनुवांशिक उत्परिवर्तनांची संख्या समान होती, परंतु त्यांचे स्वरूप भिन्न होते. वारंवार रक्तदान करणार्यांपैकी जवळजवळ 50 टक्के लोकांमध्ये कर्करोगाशी संबंधित नसलेल्या विशिष्ट प्रकारच्या उत्परिवर्तनाचे प्रमाण होते, तर केवळ 5 वेळा रक्तदान करणार्यांपैकी फक्त 30 टक्के लोकांमध्ये हे प्रमाण आढळून आले. असे मानले जाते की नियमित रक्तदान शरीराला फ्रेश रक्त पेशी तयार करण्यास प्रोत्साहित करते, ज्यामुळे स्टेम पेशींचे अनुवांशिक परिदृश्य (Genetic Landscape) फायदेशीर मार्गाने बदलते. प्रयोगशाळेतील प्रयोगांमध्ये, हे उत्परिवर्तन सामान्यत: रक्ताच्या (Blood Donation) कर्करोगाशी संबंधित उत्परिवर्तनांपेक्षा वेगळे होते. जेव्हा उंदरांमध्ये इंजेक्शन दिले गेले तेव्हा वारंवार रक्तदात्यांच्या स्टेम पेशी लाल रक्तपेशी तयार करण्यात अधिक कार्यक्षम होत्या. हे निष्कर्ष आशादायक आहेत. रक्तदान केल्याने रक्तातील कर्करोगाचा धोका कमी होतो की नाही हे निर्धारित करण्यासाठी पुढील संशोधनाची आवश्यकता आहे. प्रत्येक वेळी जेव्हा एखादी व्यक्ती रक्तदान करते, तेव्हा त्या व्यक्तीचे शरीर गमावलेल्या रक्त पेशींची जागा घेण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करते. त्यामुळे अस्थिमज्जाला नवीन पेशी तयार करण्यासाठी चालना मिळते. ही नैसर्गिक नूतनीकरण प्रक्रिया कालांतराने निरोगी, अधिक लवचिक (Resilient) रक्त पेशी निर्माण करण्यास मदत करते. काही पुरावे असेही सुचवतात की वारंवार रक्तदानामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता (Insulin Sensitivity) सुधारू शकते, त्याचप्रमाणे टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करण्यात भूमिका बजावते. याबाबतीतसुद्धा संशोधन चालू आहे. काही शास्त्रज्ञांनी रक्तदान आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य यांच्यातील संभाव्य संबंधाबद्दल अनुमान केले आहे. हृदयरोगाच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे रक्ताचा चिकटपणा- रक्त किती जाड किंवा पातळ आहे. जेव्हा रक्त खूप जाड असते, तेव्हा ते कमी कार्यक्षमतेने वाहते, ज्यामुळे रक्तात गुठळ्या, उच्च रक्तदाब (Blood Donation) आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. नियमित रक्तदानामुळे रक्ताचा चिकटपणा कमी होण्यास मदत होते आणि रक्त पातळ होते. ज्यामुळे हृदयाला पंप करणे सोपे होते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो. हृदयाचे कार्य सुधारते. रक्तदानामुळे शरीरातील लोहाची (Iron) पातळी नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. लोह हा हृदयरोगाशी संबंधित आणखी एक घटक आहे. रक्तातील ऑक्सिजनच्या वहनासाठी लोह आवश्यक असले तरी, जास्त प्रमाणात लोह साठणे हानिकारक आहे. ते हृदयरोगास कारणीभूत ठरते. रक्तदानाद्वारे लोह कमी केल्याने, दात्यांना लोहाशी संबंधित गुंतागुंतींचा धोका कमी होऊ शकतो. काही तज्ज्ञांनी, विशेषतः उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये, रक्तदान आणि कमी रक्तदाब यांच्यातील संबंध देखील सुचवला आहे. औषधोपचार किंवा जीवनशैलीतील बदलांना पर्याय नसला तरी, रक्तदान हा संपूर्ण हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यास मदत करण्याचा एक चांगला मार्ग आहे. रक्तदात्यांना कदाचित हे लक्षात येणार नाही, परंतु प्रत्येक वेळी ते रक्त देतात तेव्हा त्यांची एक छोटी आरोग्य तपासणी केली जाते. रक्तदान करण्यापूर्वी रक्तदाब, हिमोग्लोबिनची पातळी आणि नाडी तपासली जाते. काही प्रकरणांमध्ये संसर्गजन्य रोगांची तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे ब्लड शुगर, किडनीसंबंधी तपासण्या केल्या जातात. नियमित तपासणीचा पर्याय नसला तरी, संभाव्य आरोग्याच्या समस्यांसाठी व धोक्यासाठी ती पूर्वसूचना प्रणाली म्हणून काम करू शकते. अर्थात, एक महत्त्वाचा प्रश्न उरतो- हे आरोग्यविषयक फायदे रक्तदानामुळेच होतात का, की ते केवळ निरोगी दात्याच्या चांगल्या आरोग्याचे प्रतिबिंब आहे. रक्तदात्यांनी कठोर पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. दीर्घकालीन आजार, विशिष्ट संसर्ग किंवा कर्करोगाचा इतिहास असलेल्या लोकांना सहसा रक्तदान करण्याची परवानगी नसते. (उदाहरणार्थ, मधुमेह, हृदयरोग, थॉयराइड संबंधित रोग इत्यादी) याचा अर्थ असा की जे नियमितपणे रक्तदान करतात ते सर्वसामान्यांपेक्षा आधीपासूनच अधिक आरोग्यसंपन्न असतात. रक्तदानामुळे थेट आरोग्य लाभ मिळतात की नाही याची पर्वा न करता, त्याचा इतरांवर होणारा जीवनरक्षक परिणाम निर्विवाद आहे. ब्रिटनमध्ये, अमेरिकेमध्ये रुग्णालयांनी असा इशारा दिला आहे की, रक्ताचा साठा गंभीरपणे कमी आहे आणि अधिक लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे रक्तदान हे जीवनरक्षक असल्यामुळे रक्तदानासाठी लोकांना प्रोत्साहित करणे अतिशय गरजेचे आहे.