योगेश गवळी यांच्याकडून आयोजन : खासदार कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी – महाविकास आघाडीचे शिल्पकार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त भोसरी येथे कार्याध्यक्ष योगेश पंडित गवळी यांच्या पुढाकाराने भोसरी येथील पीएमटी चौकात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये 125 युनिट रक्त संकलित केले आहे. करोना काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानंतर रक्तदान शिबिर आरोग्यदायी उपक्रम घेण्यात आला. याचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, सामाजिक कार्यकर्ते पंडित गवळी, नगरसेवक अजित गव्हाणे, माजी नगरसेवक जालिंदर बापू शिंदे, माजी शिक्षण सभापती विजय लोखंडे, काशिनाथ जगताप आदी यावेळी उपस्थित होते. शरद पवार यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला 12 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण राज्यभरात करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड येथील कार्यकत्यांना हा प्रेक्षपण पाहण्याची सुविधा रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे केली आहे.