तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – सर सेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 39 जणांनी रक्तदान केले. सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी सन 1987 मध्ये स्थापन केलेल्या या पतसंस्थेच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त महापूजा अध्यक्ष सुनील दाभाडे व विद्या दाभाडे यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी उपाध्यक्ष बाळासाहेब दाभाडे, संचालक बजरंग जाधव, प्रमोद गायकवाड, रमेश दाभाडे, बाळासाहेब राजाराम दाभाडे, रमेश गिरी, प्रकाश वाघ, सविता दाभाडे, सारिका दाभाडे, साहेबराव दाभाडे, नामदेव दाभाडे, गोरख दाभाडे, सुरेश गायकवाड, मुख्य व्यवस्थापिका रुपाली दाभाडे आदी उपस्थित होते. या वेळी लाईफ लाईन ब्लड सेंटर संस्थेच्या कडून डॉ. दीपचंद्र राजवंश व जनसंपर्क अधिकारी प्रवीण नवले यांच्या उपस्थितीमध्ये सर्व स्टाफ व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करताना विशेष सहकार्य केले. संस्थेच्या प्रगतीचा आलेख सर्वांच्या सहकार्याने वाढत असल्याचे माऊली दाभाडे यांनी सांगितले. स्वागत बजरंग जाधवयांनी केले. सूत्रसंचालन रूपाली दाभाडे यांनी केली. आभार बाळासाहेब दाभाडे यांनी मानले.