जवळार्जुन : बँडच्या तालावर नाचणारी वर्हाडी मंडळी, अक्षतांच्या माध्यमातून शुभाशिर्वाद देण्यासाठी जमलेले वधू-वरांचे दृष्टीहिन व दिव्यांग बांधव अशा हृद्य वातावरणात दृष्टीहिन व दिव्यांग वधू-वरांचे रेशीमबंध जुळले. डोळ्याने दिसत नसले आणि आधाराशिवाय जरी चालता येत नसले, तरी आपले नातवाईक किंवा आपेष्ट नसूनही विवाह सोहळ्याकरता आलेल्या मान्यवरांचे भरभरून प्रेम पाहून आणि आपुलकीने दिलेल्या शुभेच्छांनी वधू-वरांच्या डोळ्याच्या कडा आनंदाश्रूनी पाणावल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्षांचे औचित्य साधून या उपक्रमाचे दिव्यांग व समरसता गतिवीधी तर्फे हा उपक्रम राबविण्यात आला . गेली 7 वर्षांत 75 दिव्यांगांचा विवाह संस्थेने केले आहेत,तसेच दिव्यांग स्वतःच्या पायावर उभे रहावेत यासाठी त्यांना व्यावसाय करण्यासाठी आटा चक्की मशीन देण्यात आली. तर आहेर म्हणून स्वयंपाकघरातील 32 प्रकारची भांडी, प्रेशर कुकर, पलंग, कपाट, मंगळसूत्र, जोडवी, नथ, पोषाख, पैठणी पर्यंत सर्व वस्तू नव वधू-वरांना भेट देण्यात आल्या अशी माहीती डॉ प्रसाद खंडागळे यांनी दिली. या दिव्यांग जोडप्यांच्या विवाह सोहळ्यात अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा सोहळा स्व. मधुकरराव पवळे क्रीडांगण, यमुनानगर, निगडी, पुणे येथे आनंदाने पार पडला. सोहळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी हरिश्चंद्र सरडे, बाळासाहेब कांबळे, डॉ. राजेंद्र खेडेकर, डॉ. प्रसाद खंडागळे, रवी ननावरे, विठ्ठल कडू, भोलाशेठ वांजळे, प्रशांत पोमण, विकास माने, डॉ. धनंज भिसे, युवराज दाखले, नाना कांबळे, ललिता जगताप, अॅड. मुकुंद यदमळ, राहुल भिंगारे, घानः शाम वाघमारे, जनार्दन माने, ललिता जगताप, आनंद जोशी, मधुकर्णीका सासवडे, प्रशांत उंदरे, आदींनी परिश्रम घेतले.