पुणे जिल्हा | शरद बुट्टे पाटलांना विधिमंडळात जाण्याचा आशीर्वाद द्या

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – 25 वर्षांच्या राजकीय जीवनामध्ये शरद बुट्टे पाटील यांनी समाजातील सर्व घटकांसाठी कार्य केले. वारकर्यांविषयी प्रेम जिव्हाळा असल्याने ते वारकर्यांचे प्रश्न सोडवतील. राजकीय जीवनात काम करताना त्यांनी निष्कलंकपणा जपल्याने त्यांच्यावर आतापर्यंत कसलाही डाग नाही.
राजकारणातील एक स्वच्छ चेहरा म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. त्यांचे वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व या चारही गोष्टीचा मिलाफ त्यांच्याकडे आहे. सुसंस्कृत व कर्तृत्वसंपन्न असलेले व्यक्तिमत्व शरद बुट्टे पाटील यांना तालुक्यातील जनतेने विधिमंडळात जाण्यासाठी आशीर्वाद द्यावा, असे विचार पंकज महाराज गावडे यांनी व्यक्त केले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष,पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शरद बुट्टे पाटील यांचे वाढदिवसानिमित्त संतोषनगर-भाम (ता.खेड) येथे खेड आळंदीचे भूमितील 85 कीर्तनकारांचा सन्मानचिन्ह, वारकरी उभा पोशाख देऊन सत्कार व तालुक्यातील 200 भजनी मंडळांना सतरंजी व पिण्याचे पाण्याचे जार वाटप प्रसंगी आयोजित प्रवचन करताना पंकज महाराज गावंडे बोलत होते.
यावेळी भरत महाराज थोरात, पोपट महाराज राक्षे, रंगनाथ महाराज नाईकडे, बाळशिराम महाराज मिंडे, नीलिमाताई महाराज पोतले, किसन महाराज धंद्रे, सागर महाराज शिर्के, किशोरमहाराज बांगर, शशिकांतमहाराज राऊत, लक्ष्मण महाराज मुसळे आदी कीर्तनकारांसह भाजपा किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भशरद बुट्टेगवान पोखरकर, राम गावडे, शांताराम भोसले, माजी सभापती लक्ष्मण टोपे, अमोल पवार, बाजार समिती संचालक सोमनाथ मुंगसे,
सागर मुर्हे, महेंद्र गोरे, जयसिंग भोगाडे, चंदन मुर्हे, राजेंद्र सांडभोर, चांगदेव शिवेकर, अशोक उमरगेकर, रामदास भोसले, राजगुरूनगर बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, शेखर शेटे, भगवान शेळके, डॉ. ताराचंद कराळे, संदीप बाणखेले, मारूती शेळके, मनोज मांजरे, गुलाब खांडेभराड, वसंत भसे, सुधीर मुंगसे, दशरथ गाडे,
ज्योती अरगडे, संजय रौंधळ, दिलीप वाळके, पांडुरंग ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी विविध राजकीय पक्षाचे नेते, तालुक्यातील गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहून शरद बुट्टे पाटील यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी तर सुनील देवकर यांनी आभार मानले.
शरद बुट्टेपाटील तालुक्यातले सुसंस्कृत आणि दिशादर्शक नेतृत्व असून त्यांना राजकीय सार्वजनिक जीवनामध्ये अनेक चांगल्या संधी मिळण्याचे संकेत आहे.ते आपल्या पदाचा उपयोग समाजातील सर्व स्तराच्या सकारात्मक प्रगतीसाठी करतील. b- भरत महाराज थोरात, हभप
सार्वजनिक जीवनात काम करताना मी कोणतीही चुकीचे काम केले नाही. माझ्या व्यक्तिमत्त्वावरती वारकरी संप्रदायाचे झालेला संस्कार असून वाढदिवसानिमित्ताने कीर्तनकार महाराजांचे सन्मानाने मला आशीर्वाद दिले ते वायाला जाणार नाही. एखादी राजकीय संधी मिळेल न मिळेल परंतु माझ्याकडून चुकीचे काम होणार नाही. – शरद बुट्टे पाटील,





