पेशावर – ईशनिंदेचा आरोप असलेल्या अहमदी या अल्पसंख्यांक समाजातील एका व्यक्तीची आज पेशावरमध्ये भर न्यायालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ताहिर अहमद असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मानसिक रुग्ण होता, असे बोलले जात आहे. या आरोपीची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला त्वरित अटक करण्यात आली. कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही तो न्यायालयामध्ये पिस्तुल घेऊन आला होता.
आपल्या या व्यक्तीची हत्या करण्याचे आदेश प्रेषितांनी स्वप्नात येऊन दिले होते, असे या मारेकऱ्याने म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या अहमदी समाजाची पाकिस्तानातील लोकसंख्या 40 लाख इतकी आहे.
पाकिस्तानमध्ये 1974 पासून अहमददियांना मुस्लिम धर्मातील मानले जात नाही. त्या समाजावर हल्ले होणे, धमक्या, अपहरण आणि त्यांच्याविरोधातील द्वेष भावना भडकावण्याची मोहिम राबवली जाण्याचे सत्र तेथे अव्याहतपणे सुरू असते. या अशा घटनेची मानवी हक्कविषयक संघटनांनी तीव्र शब्दात निंदा केली आहे.