नगर | चिचोंडी पाटील येथे काळी फित लावून धरणे आंदोलन

नारायणडोहो | नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ काळी फीत लावून धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती मा.सभापती प्रविण कोकाटे, शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे, शिवसेना नेते डॉ. ययाती फिसके, मा.सरपंच डॉ.मारुती ससे, मच्छिंद्र खडके, शहाजी गोरे, हरिभाऊ कोकाटे आदींनी आपल्या भाषणातून तीव्र निषेध व्यक्त केला. आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली.शासनाने या घटनेमध्ये राजकारण न आणता माता भगिनींच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी चेअरमन महादेव खडके, व्हा.चेअरमन अर्जुन वाडेकर, उपसरपंच विश्वसागर कोकाटे,मा. सरपंच दिलीप पवार, राजेंद्र कोकाटे, काशिनाथ बेल्हेकर,राजेंद्र पवार, भाऊसाहेब वाडेकर, पै.राजूभाऊ कोकाटे, अजय कांकरिया, महादेव खडके, प्रकाश कांबळे, संदीप काळे, ज्ञानेश्वर ठोंबरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक कांबळे यासह चिचोंडी पाटील येथील संवेदनशील नागरिक महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





