VIDEO: ब्लॅक ड्रेस, ब्ल्यु आईज…. अभिनेता रजत बेदीच्या लेकीने वेधले सर्वांचे लक्ष

Rajat Bedi’s Daughter Vera Bedi | अभिनेता रजत बेदीला ‘कोई मिल गया’ मधील खलनायकाच्या भूमिकेमुळे मोठी प्रसिद्धी मिळाली. यानंतर आता आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये भूमिका साकारत आहे. नुकत्याच झालेल्या सीरिजच्या प्रीमियरला रजत बेदीने कुटुंबासह हजेरी लावली. यावेळी त्याची मुलगी वेरा बेदीच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
बॉलीवुड अभिनेता रजत बेदी यांची मुलगी वेरा बेदी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. ‘द बॅड्स ऑफ बॉलीवुड’च्या ग्रँड प्रीमियर इव्हेंटमध्ये तिच्या सौंदर्याने आणि स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वेराच्या लूकबद्दल बोलायचे तर, तिने काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला होता आणि त्यासोबत एक छोटी पर्स घेतली होती. तिच्या निळ्या रंगाच्या डोळ्यांनी तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
अनेकांनी तिची तुलना बॉलीवूडची ‘बेबो’ अर्थात करीना कपूर सोबत केली आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले, ‘लिटिल करीना,’ तर दुसऱ्याने म्हटले, ‘हिरोपेक्षा खलनायकाच्या मुली जास्त सुंदर आहेत.’ रजत बेदीची मुलगी वेरा बेदी तिच्या सौंदर्याने अनेक बॉलीवुड अभिनेत्रींना टक्कर देत आहे. तिच्या स्टाइल आणि आकर्षक लूकमुळे ती सध्या चर्चेत आहे. Rajat Bedi’s Daughter Vera Bedi |
दरम्यान, वेरा बेदीचा जन्म 12 फेब्रुवारी 2007 रोजी झाला. ती सध्या फक्त 18 वर्षांची आहे. वेरा सध्या आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे. मात्र आता वेरा बेदीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार का अशी चर्चा आता सुरु झाली आहे. Rajat Bedi’s Daughter Vera Bedi |
हेही वाचा:
निवडणूक आयोगाची भाजप अन् द्रमुकच्या मित्रपक्षांवर कारवाई ; ‘त्या’ ४२ तमिळ पक्षांची नोंदणी रद्द





