प्रेमात धोका मिळाल्याने भाजपच्या युवा नेत्याची आत्महत्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा
Updated On:

छत्तीसगड – प्रेम प्रकरणातून भारतीय जनता युवा मोर्चाचा नेत्याने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्तीसगडमधील दुर्ग शहरात ही घटना घडली आहे.
गोपाळ सिंह राजपूत असे आत्महत्या करणाऱ्या नेत्याचे नाव असून आत्महत्येपुर्वी त्याच्या पाकिटात एक सुसाईड नोट मिळाली त्यामध्ये प्रेमात धोका मिळाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपाळने सर्वात आधी हाताची नस कापली आणि नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ तो दार उघडत नसल्यामुळे त्याच्या भावाने दरवाजा तोडला. त्यावेळी गोपाळने गळफास घेतला होता. गळफास घेण्यापूर्वी त्याने स्वतःच्या हाताची नसदेखील कापली होती.





