Kashinath Chaudhari Palghar | पालघर साधू हत्याकांड प्रकरणात भाजपने ज्या नेत्यावर आरोप केले होते, त्यालाच दोन दिवसपूर्वी पक्षात प्रवेश दिला. या प्रकरणात भाजपने त्यावेळी काशिनाथ चौधरी यांच्यावर आरोप केले होते. यावरून विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरूवात केल्यानांतर भाजपने त्यांच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती दिली. काशिनाथ चौधरींना पक्षात प्रवेश देऊन 24 तासांत भाजपने आता यू-टर्न घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवून चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती देत असल्याचं कळवले आहे. यावर आता चौधरी यांनी आपली बाजू मांडली आहे. काशिनाथ चौधरी म्हणाले की, “दोन दिवसांपूर्वी मी भाजपात प्रवेश केला, त्यानंतर ५ वर्षापूर्वी घडलेल्या गडचिंचले येथील साधू हत्याकांडांचे प्रकरण उकरून काढले गेले. ज्यावेळी ती घटना घडली तेव्हा पोलिसांसोबत मदतीला मी तिथे गेलो होतो. मात्र या घटनेशी माझा थेट आरोपी म्हणून संबंध जोडला जातो. या घटनेशी माझा कुठेही संबंध नाही. या संपूर्ण प्रकरणाचा तपास झाला आहे. आरोपपत्र दाखल झाले आहे. त्यात कुठेही माझे आरोपी म्हणून नाव नाही. एवढे असताना माझ्यावर या घटनेचा आरोपी म्हणून आरोप होतायेत हे माझ्यासाठी अतिशय वेदनादायी आहे.” Kashinath Chaudhari Palghar | माझं राजकीय करियर उध्वस्त झालं तरी चालेल पण… “माझ्यापेक्षा माझ्या कुटुंबाला याच्या वेदना सहन कराव्या लागत आहेत. माझी २ मुले आहेत. माझ्या मुलाला त्याच्या हॉस्टेलमध्ये तुझा बाप गुन्हेगार आहे, खूनी आहे असं बोलले जाते. त्याच्याशी कुणी बोलायला तयार नाही. आज त्याचा पेपर आहे तो पेपरलाही जायच्या मानसिकतेत नाही. आम्ही गरीब कुटुंबातील आहोत. संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे. मी माझ्या कुटुंबातला पहिला राजकारणी आहे. माझ्या कुटुंबातील कुणीही साधी ग्रामपंचायत लढली नाही. तळागाळात कार्यकर्त्यांसोबत काम करतोय. माझं राजकीय करियर उध्वस्त झालं तरी चालेल पण यामध्ये माझे कुटुंब, माझी मुलं भरडली जात आहेत ते थांबवावे. माझ्यावर हे आरोप होत आहेत, त्यामुळे मी व्यथित आहे, माझे कुटुंब व्यथित आहे,” असं सांगताना काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर झाले. Kashinath Chaudhari Palghar | आरोपी नाही तर या घटनेचा साक्षीदार या प्रकरणात आरोपी नाही तर या घटनेचा साक्षीदार असल्याचे त्यांनी सांगितले. “या घटनेशी संबंधित कुठल्याही तपास यंत्रणेसमोर मी पुन्हा नव्याने जायला तयार आहे. परंतु या घटनेशी माझा थेट संबंध जोडू नका. माझं अजून भाजपाच्या वरिष्ठांशी बोलणं झाले नाही. मी कुणाशीही बोललो नाही. मी माझ्या कुटुंबासोबत आहे. ज्या घटनेचा मी साक्षीदार आहेत, निष्पाप साधूंना वाचवण्यासाठी मी पोलिसांसोबत तिथे गेलो. परंतु मला त्यात आरोपी बनवण्याचं काम सोशल मीडियातून केले गेले. त्याबाबत मी खुलासा करण्यासाठी माध्यमांसमोर आलो. या देशातील कुठल्याही चौकशी यंत्रणेला सामोरे जायला मी तयार आहे,” असेही काशिनाथ चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले. Kashinath Chaudhari Palghar | हेही वाचा: BMC निवडणुकीसाठी भाजपचा फॉर्म्युला काय? चंद्रशेखर बावनकुळेंनी चित्र केलं स्पष्ट म्हणाले ” 51 टक्के…”