भाजपचा शिवसेना विश्‍वासघात करणार नाही – आदित्य

चिपळूण: आगामी विधानसभा निवडणूक लढवायला सज्ज आहे, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच शिवसेना-भाजप युतीमध्ये शिवसेना विश्‍वासघात करणार नाही, असे वक्‍तव्यही त्यांनी केले आहे.

जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत.
गेल्या काही दिवसांत शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये तिढा निर्माण झालाचे चर्चा सुरू आहे. त्यावर युतीबाबत नेमके ठरले आहे. बाहेर कोण काय बोलत आहेत हे मला माहीत नाही. शिवसेना-भाजपमध्ये जे इनकमिंग सुरू आहे, त्यावर आम्ही योग्य उमेदवार पारखून घेत आहोत. युतीत शिवसेना विश्‍वासघात करणार नाही, अशी खात्री आदित्य ठाकरेंनी दिली.

राज्यातील 288 जागांची चाचपणी करणे हे दोन्ही पक्षाचे काम आहे. कारण दोघांची ताकद तपासणे गरजेचे आहे. त्यासाठी या आढावा बैठका घेतल्या जात आहेत, असे म्हणत युती होणारच असा विश्‍वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला.
वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार आहेत, अशी चर्चा आहे. त्यावर मी निवडणूक लढवण्यास सज्ज आहे. जनतेने आदेश दिला की निवडणूकही लढेन, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. खासदार नारायण राणे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर शिवसेनेचा कोणीही पारंपरिक शत्रू उरला नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.