मुंबई : येत्या काही महिन्यांमध्ये महानगपालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाने एक मोठा निर्णय (BJP’s Janata Darbar) घेतला आहे. येत्या २२ एप्रिल २०२५ रोजी ‘जनता दरबार’ या (BJP’s Janata Darbar) विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भाजपने काढले पत्रक भाजप प्रत्येक महिन्याला जनता दरबार आयोजित करणार आहे. भाजपचे सर्व मंत्री प्रदेश कार्यालयात येऊन जनता दरबार घेणार आहेत. भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यासंदर्भात पत्र जारी केले असून, केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांशी संबंधित जनतेच्या तक्रारी, समस्या आणि सूचना थेट मंत्र्यांच्या उपस्थितीत मांडण्याची संधी या उपक्रमातून देण्यात येणार आहे. ‘ही’ महिला नेता घेणार पहिला जनता दरबार २२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३.०० ते ४.३० वाजेपर्यंत भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांचा जनता दरबार मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित केला आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून भाजप लोकसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत असून, मंत्रिमंडळातील सर्वच सदस्यांना यात सहभागी होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जनता दरबार अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रीदेखील जनता दरबार (BJP’s Janata Darbar) घेत आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आठवड्याला एक एक मंत्री जनता दरबार घेतो. या जनता दरबाराच्या लोकांचे प्रश्न सोडवण्यास मदत होते.