मुंबई: ५ वर्षांत भाजप आणि मोदी सरकारने काय केले ? हे उत्तर अपेक्षित असताना मोदी साहेब याबाबत काही बोलत नाहीत. भाजप हा शेतमालाचा उत्पादन करणारा नाही तर शेतकऱ्यांची लूट करणारा पक्ष आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा येथे प्रचार सभेत बोलताना, शरद पवारांवर टीका केली. पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी याला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
खा. @PawarSpeaks पवारसाहेब हे राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आहेत व त्यांनी देशातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. पवार साहेबांनी शेतकऱ्यांसाठी जे केले त्यापैकी आपण काय केले आहे, असा सवाल मुख्य प्रवक्ते @nawabmalikncp यांनी पंतप्रधान @narendramodi ना केलाय. pic.twitter.com/cPiGyA7Zri
— NCP (@NCPspeaks) April 1, 2019