भाजपचे ‘डबल इंजिन’ गंजले – डिंपल यादव

कौशांबी (उत्तर प्रदेश) – भाजपच्या “डबल-इंजिन”ला गंज चढला आहे आणि तो आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पोशाखाच्या रंगासारखा दिसत आहे, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
सिरथू येथे सपा-अपना दल (कामेरवाडी) आघाडीच्या उमेदवार पल्लवी पटेल यांच्या समर्थनार्थ निवडणूक सभेला डिंपल संबोधित करत होत्या.
डिंपल यादव म्हणाल्या, सपा हा एकमेव पक्ष आहे जो आश्वासने पाळतो. ज्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण आहे. दुसरीकडे भाजपच्या दुहेरी इंजिनला गंज चढला आहे आणि लोखंडाला गंज लागल्यावर त्याचा रंग कसा असतो, असा सवाल केला.
तसेच मला वाटते की हे मुख्यमंत्र्यांच्या कपड्यांसारखा आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच उत्तर प्रदेशला लागलेला गंज काढून पुन्हा रुळावर आणण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले.





