“भाजपाचं डबल इंजिन हे तरुणांवर डबल अत्याचाराचे प्रतीक बनले”; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Priyanka Gandhi | बिहार लोकसेवा आयोगाच्या (BPSC) 70 व्या एकत्रित प्राथमिक परीक्षेबाबतचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यातच आता बिहार लोकसेवा आयोगाच्या (बीपीएससी) परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांवर बळाचा वापर केल्याबद्दल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
भाजपाचं ‘डबल इंजिन’ हे तरुणांवरील डबल अत्याचाराचं प्रतीक बनलं आहे, असा आरोप त्यांनी केला. प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे. “बिहारमध्ये तीन दिवसांत दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांवर अत्याचार झाला. परीक्षेतील भ्रष्टाचार, हेराफेरी आणि पेपरफुटी रोखणं हे सरकारचं काम आहे. पण भ्रष्टाचार थांबवण्याऐवजी विद्यार्थ्यांना आवाज उठवण्यापासून रोखलं जात आहे. या कडाक्याच्या थंडीत तरुणांवर पाण्याचा मारा आणि लाठीचार्ज करणं अमानवीय आहे” प्रियंका यांनी म्हटलं आहे. Priyanka Gandhi |
बिहार में तीन दिन के अंदर दूसरी बार छात्रों पर अत्याचार किया गया। परीक्षाओं में भ्रष्टाचार, धांधली, पेपर लीक रोकना सरकार का काम है। लेकिन भ्रष्टाचार रोकने की जगह छात्रों को आवाज उठाने से रोका जा रहा है।
इस कड़ाके की ठंड में युवाओं पर पानी की बौछार और लाठी चार्ज करना अमानवीय है।… pic.twitter.com/te9MOhoKPG
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) December 30, 2024
आंदोलकांवर पाण्याचा मारा
आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत परीक्षा रद्द करण्याची मागणी करत गांधी मैदानाजवळ धरणं आंदोलन केलं. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतरही रस्ता रिकामा करण्यास नकार दिला. आंदोलनाची तीव्रता वाढत असताना पोलिसांनी आधी पाण्याचा मारा करून जमावाला पांगवलं. याचाही फायदा झाला नाही तेव्हा लाठीचार्ज करण्यात आला, त्यामुळे अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. यावेळी महिला आंदोलकांनी पोलिसांवर गैरवर्तनाचा आरोपही केला आहे.
या निषेधांच्या पार्श्वभूमीवर, बिहार लोकसेवा आयोगाने अंदाजे 12,000 उमेदवारांसाठी 70 व्या एकात्मिक एकत्रित स्पर्धात्मक (प्राथमिक) परीक्षाच्या पुनर्परीक्षेची घोषणा केली. 4 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेत विशेषत: पटना येथील बापू परिसार परीक्षा केंद्रावर 13 डिसेंबर रोजी बसलेल्या उमेदवारांचा समावेश असेल. Priyanka Gandhi |
हेही वाचा :
Saving Schemes: पोस्ट ऑफिसची खास योजना, दरमहिना 5 हजार गुंतवून मिळवा 8 लाख रुपये; पाहा डिटेल्स





