Pune Municipal Corporation Election Results : पुणे महापालिका निवडणुकीच्या निकालात भाजप आपली मजबूत पकड आणखी घट करताना दिसत आहे. आता प्रभाग क्रमांक १० चा निकाल हाती आला असून, येथेही भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या प्रभागातील भाजपचे सर्वच उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. या प्रभागातून किरण दगडे पाटील, दिपाली पवार, अल्पनाताई वरपे आणि दिलीप वेडेपाटील या भाजप उमेदवारांचा विजय झाला आहे. या निकालामुळे भाजपने आणखी एका प्रभागात आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचे चित्र आहे. सुरुवातीपासूनच भाजपने निकालात जोरदार मुसंडी घेतली असून, ती कायम ठेवल्याचे चित्र आहे. भाजपच्या जास्तीत जास्त जागा पुणे महापालिकेवर निवडून जातील, असा अंदाज एक्सिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आणखी किती ठिकाणी भाजप विजयाचा गुलाल उधळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.