सातारा – साताऱ्यात पालिका निवडणुकीत अपक्षांनी खाते खोलले तरी भाजपाच्या उमेदवारांनी विजयी आघाडी घेतली आहे. सातारा शहरातील निवडणुकीत अपक्षांनी नारळ फोडला. प्रभाग १ मधून अपक्ष शंकर किर्दत विजयी झाले. तर प्रभाग क्रमांक चार दोन्ही भाजपचे उमेदवार विजयी झाले. निशांत पाटील आणि भारती सोळंकी यांनी येथे विजय मिळवला. प्रभाग ५ मधून भाजपचे अपर्णा बाचल आणि विजय देसाई हे दोन्ही उमेदवार विजयी झाले.