Maharashtra BJP : 4 मे या दिवशी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. हा निकाल भाजपसाठी मोठा दिलासा देणारा ठरला. भाजप गेल्या काही काळापासून ज्या राज्याच्या प्रतिक्षेत होते. त्या पश्चिम बंगला या राज्यात कमळ फुलले आहे. पाचपैकी तीन राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालामुळे भाजपात आनंदाचे वातावरण आहे. या विजयाचा जल्लोष महाराष्ट्रातही करण्यात आला. निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ मे रोजी महाराष्ट्र भाजपने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यभरात समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजक यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. आगामी काळात पक्षाचे समन्वय आणि विविध कार्यक्रम प्रभावीपणे राबवण्याची जबाबदारी नव्या पदाधिकाऱ्यांवर असणार आहे. प्रत्येक विभागासाठी स्वतंत्रपणे समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजक नेमण्यात आले असून, संघटन विस्तार आणि पक्ष मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. या विभांगावर नियुक्ता जाहीर (Maharashtra BJP) मुंबई, ठाणे-कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ अशा सहा विभागांत समन्वयक, संयोजक आणि सहसंयोजक यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. कोणाची कुठे नियुक्ती? (Maharashtra BJP) मुंबई विभागासाठी राजेश पांडे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठाणे-कोकण विभागात योगेश सागर यांच्याकडे समन्वयकपद सोपवण्यात आले असून, प्रमोद जठार संयोजक आणि संजय वाघुळे सहसंयोजक पदावर नियुक्त करण्यात आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात निरंजन डावखरे यांच्यावर समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली असून विक्रम पावसकर संयोजक आणि विक्रम देशमुख सहसंयोजक म्हणून काम पाहतील. उत्तर महाराष्ट्रासाठी माधवी नाईक यांची समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली असून, विजय चौधरी संयोजक आणि मंगेश चव्हाण सहसंयोजक असणार आहेत. मराठवाडा विभागात सुनील राणे समन्वयक म्हणून काम पाहणार असून नितीन काळे संयोजक आणि राहुल लोणीकर सहसंयोजक म्हणून जबाबदारी पार पाडतील. विदर्भात संजय कुटे यांच्यावर समन्वयक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून दिनेश सूर्यवंशी संयोजक आणि प्रविण दटके सहसंयोजक असतील. हेही वाचा : Shweta Tiwari: वय फक्त आकडा! ४५ व्या वर्षी श्वेता तिवारीने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने