Maharashtra Election : नाशिकमध्ये राडा! भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराची स्कॉर्पिओ फोडली

नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नुकताच विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला आहे. काही वेळापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ही घटना ताजी असताना आता नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे समोर आले आहे.
काय घडले नेमके?
नाशिकमध्ये पुन्हा एकदा पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा झाला आहे. भाजपचे राहुल ढिकले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांचा कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची गाडी फोडली.
गणेश गीते यांच्याकडून पैसे वाटप होत असल्याचा राहुल ढिकले यांच्या समर्थकांचा आरोप आहे. गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांकडून स्लीप वाटप केलं जात होतं. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड केली. या घटनेमुळे नाशिक शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.





