खालापूर, (वार्ताहर) – ग्रामीण भागातील वावोशी येथे भाजपा खालापूर तालुका मंडळ विभागाच्या वतीने महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला जवळपास १५०० पेक्षा जास्त महिलांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमाचे नियोजन माजी सभापती नरेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव, नागेश पाटील, रविंद्र पाटील, भरत महाडिक, सुजाता दळवी, श्वेता मनवे, निकीता हेलंडे, वत्सला मोरे यांनी केले होते. शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, त्या योजनेचे खरे सुत्रधार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांनी योजनेसाठी अथक मेहनत घेतली असल्याने योजनेबाबत महिलांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे समजून घेण्यासाठी संपूर्ण राज्यभरात भाजपाच्या वतीने महिलांचे मेळावे घेतले जात असल्याचे रायगड भाजपाचे उपाध्यक्ष सनी यांनी सांगितले.