Ravindra Chavan | भाजप प्रदेशाध्यक्षपदी लवकरच आता रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने नवीन अध्यक्षांची निवड करण्याचे विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट झाले होते. रविंद्र चव्हाण यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करून त्यांचीच प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार हे पक्षाने सूचित केले होते. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तसेच राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी केंद्रीय संसदीय कार्य व अल्पसंख्याक विकासमंत्री किरेन रिजिजू यांची पक्षाने नियुक्ती केली होती. त्यानुसार आता रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी 30 जूनला अर्ज भरणार आहेत. 1 जुलैला नियुक्ती जाहीर केली जाणार आहे. वरळी डोम येथे 1 जुलैला सकाळी 11 वाजता अधिकृत घोषणा होणार आहे. यावेळी भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. Ravindra Chavan | राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याच्या दिशेने पाऊल टाकत, भाजपने शुक्रवारी महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील संघटनात्मक निवडणुकांवर देखरेख करण्यासाठी दोन केंद्रीय मंत्री आणि एक माजी केंद्रीय आणि विद्यमान खासदार यांची राज्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली. या निवडणुका पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीची पूर्वसूचना आहेत. देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू नेते रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील मानले जातात. अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी त्यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. कार्याध्यक्षपदावरून चव्हाण यांना अध्यक्षपदी बढती दिली जाईल. डोंबिवलीचे आमदार असलेले ५५ वर्षीय चव्हाण हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. गेल्यावर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. तेव्हापासूनच ते नवे भाजप प्रदेशाध्यक्ष असतील असे मानले जात होते. हेही वाचा: पुण्यात नामांतरावरून आक्षेपार्ह बॅनरबाजी, मेधा कुलकर्णी भावूक; म्हणाल्या “टीका करा, पण काहीतरी पातळी ठेवा”