नवी दिल्ली – सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. यातच बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला न्याय मिळवून देण्याची मागणी करणारी स्टिकर्स छापली आहेत. त्यामुळे बिहारमध्ये सुशांत मृत्यूप्रकरण निवडणूक प्रचाराचा मुद्दा ठरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा पक्षावर निशाणा साधला आहे.
#Justice4SSR साठी सर्व देश एकवटला असताना या विषयाचं वाईट राजकारण केलं जात असल्याचं व आधी बोलल्याप्रमाणे बिहार निवडणुकीसाठी भांडवल केलं जात असल्याचं दिसतंय. विकासापासून वंचित असलेल्या बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याच्या या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत, ही अपेक्षा. pic.twitter.com/rEFxwg4Gjb
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 6, 2020
काय म्हणाले रोहित पवार
‘सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व देश एकवटला असताना या विषयाचं वाईट राजकारण केलं जात आहे, विकासापासून वंचित असलेल्या बिहारमधील मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवण्याच्या या अजेंड्याला लोक आता बळी पडणार नाहीत, ही अपेक्षा,” अशी टीका रोहित पवार यांनी केली असून भाजपा पक्षाकडून छापण्यात आलेल्या सुशांत सिंह राजपूतच्या स्टिकरचं छायाचित्र पोस्ट केले आहे.