आंध्र प्रदेशात फॉर्म्युला फायनल ! भाजप-टीडीपी आणि जनसेना यांची युती, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार, जाणून घ्या

BJP TDP Alliance Formula । २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये भाजप आणि तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) यांच्यातील युती जवळपास निश्चित झालीय. त्यासाठी जागावाटपाचा फॉर्म्युलाही तयार करण्यात आलाय. भाजपने टीडीपीसोबत करार केला आहे. ज्याअंतर्गत भाजप आणि जनसेना लोकसभेच्या 8 जागांवर एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत तर विधानसभेच्या 30 जागांवरही बोलणी निश्चित झाली आहेत.
भाजप आपला प्रतिनिधी आंध्र प्रदेशात पाठवत आहे. त्यानुसार चंद्राबाबू नायडू यांच्या ‘घरवापसी’ची घोषणा करणारी त्रिपक्षीय पत्रकार परिषद घेणार आहे. चंद्राबाबू नायडू गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीतच होते. या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर ते भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन हैदराबादला परततील.
जागांचे वाटप निश्चित केलं जातय BJP TDP Alliance Formula ।
याआधी गुरुवारी टीडीपीचे चंद्राबाबू नायडू आणि जनसेनेचे पवन कल्याण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीत बैठक घेतली होती. ज्यामध्ये युतीबाबत चर्चा झाली आणि जागावाटपाच्या सूत्रावरही चर्चा झाली. आता फक्त जागावाटप बाकी आहे, त्यानंतर युतीची घोषणा होणार आहे.
लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका होणार BJP TDP Alliance Formula ।
लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होणार आहेत. अशा स्थितीत जागा वाटपात विलंब होत होता. त्याचवेळी भाजप आणि टीडीपीमध्ये काही जागा आणि उमेदवारांबाबत मतभेद आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप २५ पैकी ६ जागांची मागणी करत आहे, तर टीडीपी ४ जागा देण्यास तयार आहे. अशा स्थितीत भाजप आणि जनसेना या दोन्ही पक्षांनी मिळून लोकसभेच्या 8 आणि विधानसभेच्या 30 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा
आंध्र प्रदेशमध्ये जागा वाटपावर शिक्कामोर्तब? ; चंद्राबाबू नायडू-अमित शहा यांच्यात भेट
आंध्र प्रदेशात तेलगु देसम- जनसेना पक्षाचे जागावाटप जाहीर





