मुंबई: ओबीसी जनगणना करण्याच्या मागणीला भाजपाचा पाठिंबा आहे. ही धोरणात्मक बाब असल्याने यासाठी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन आपण सारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेऊ, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य विधानसभेत केली.
ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी, ही सबंध महाराष्ट्राची व देशाची मागणी आहे. देशातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५४ टक्के लोकसंख्या ओबीसी समाजाची आहे. असे असताना एक नागरिक म्हणून ओबीसींच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात का, यासंदर्भात माहिती उपलब्ध नाही. यासाठी ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत केली.
तसेच समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे या स्वतंत्र ओबीसी जनगणनेसंदर्भात राजकारण न करता या मागणीचे समर्थन करावे. जातनिहाय जनगणना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र यावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले होते.
VIDEO: ‘सावरकर’ प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस विधानसभेत कडाडले
ओबीसी सामाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी; छगन भुजबळांची विधानसभेत मागणी