Karnataka Politics : कॉंग्रेसच्या हमींचा भाजपने घेतला धसका – रणदीप सुर्जेवाला

नवी दिल्ली – कर्नाटकमधील जनतेला कॉंग्रेसने महत्त्वाच्या हमी दिल्या आहेत. त्या हमींचा धसका सत्तारूढ भाजपने घेतला आहे, अशी खिल्ली कॉंग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सुर्जेवाला यांनी उडवली.
कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्या रणसंग्रामासाठी सज्ज झालेल्या कॉंग्रेसने तेथील जनतेला दोन हमी दिल्या. त्यामध्ये दरमहा 200 युनिट वीज मोफत आणि महिला कुटूंबप्रमुखाला दरमहा 2 हजार रुपये देण्याचा समावेश आहे.
कॉंग्रेसने दिलेल्या हमींच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमधील भाजप सरकारने काही जाहिराती प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये महिलांच्या नावे कॅश ट्रान्सफर करण्याचे आश्वासन देण्यात आले. याचा संदर्भ देऊन सुर्जेवाला यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/bjps-anup-gupta-wins-chandigarh-mayor-polls-by-1-vote/
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला उपलब्ध केल्या जाणाऱ्या मोफत सुविधांना रेवडी संस्कृती म्हणतात. आता त्यांच्याच भाजपचे कर्नाटकमधील सरकार त्यांच्या भूमिकेला छेद देणार आहे का, असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकमधील राजकीय वातावरण तापू लागल्याचे सूचित होत आहे.


