भाजपकडून देशभर जन जागरण अभियानाचे आयोजन

अमित शहा अभियानासाठी 22 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार

मुंबई : केंद्र सरकारने जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर देशातील जनतेमध्ये याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. हेच संभ्रमाचे वातावरण आता जनजागृती करून दुर करणार आहे. यासाठी भाजपाकडून देशभर जन जागरण अभियान आयोजित करण्यात आले आहे. यासाठी गृहमंत्री अमित शाह 22 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमित शाह यांच्या या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र भाजपाकडून एका विशेष महासभेचे देखील आयोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपाच्या या जन जागरण अभियानचा उद्देश जनतेला कलम 370 हटवण्याचा निर्णय मोदी सरकारने का घेतला, हे पटवून देणे असा आहे. कलम 370 पंतप्रधान मोदी सरकारने हटवल्यांतर सातत्याने कॉंग्रेसकडून टीक केली जात आहे. या मुद्यावरून विरोधकांनी वारंवार सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर व महाराष्ट्रातील आगामी निवडणुका पाहता भाजपा अध्यक्ष व गृहमंत्री अमित शाह आता मैदानात उतरत असल्याचे दिसत आहे. भाजपाच्यावतीने जन जागरण अभियान अंतर्गत देशभरात 35 सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here