भाजपकडून अभिनेते सनी देओल, किरण खेर यांच्यासह ३ जणांना उमेदवारी
Updated On:

नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आज ३ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या मध्ये चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री किरण खेर, तसेच अभिनेता सनी देओल आणि सोम प्रकाश यांचा समावेश आहे.
भाजपने चंदीगढ मधून एक आणि पंजाब मधील दोन अशा तीन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आजच बॉलीवूड अभिनेता सनी देओल याने भाजपमध्ये जाहिररित्या प्रवेश केला आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत त्याने हा प्रवेश केला.
३ मतदार संघ आणि उमेदवार
चंदीगढ – किरण खेर
गुरुदासपूर – सनी देओल
होशियारपूर – सोम प्रकाश





